मुंबई

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप

सकाळ वृत्तसेवा

‘कमला’ इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून २९ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राहत असलेल्या मिस्त्री कुटुंबातील तिघांचा आगीमुळे मृत्यू झाला.

- रोहिणी गोसावी

मुंबई - ‘कमला’ इमारतीला (Kamala Building) लागलेल्या आगीत (Fire) सहा जणांचा मृत्यू (Death) झाला असून २९ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राहत असलेल्या मिस्त्री कुटुंबातील तिघांचा आगीमुळे मृत्यू झाला. आगीत अडकलेल्या अनेकांचे प्राण वाचवणारा इमारतीचा सुरक्षा रक्षक मनीष सिंगही वाचू शकला नाही. अनेक रहिवाशांना जिन्यावरून रस्ता दाखवत त्याने खाली येण्यास मदत केली, पण तो स्वतःला वाचवू शकला नाही.

४२ वर्षांचे हितेश मिस्त्री, त्यांची मोठी बहीण मौसमी (४५) आणि त्यांची आई असे तिघे इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राहत होते. दोघेही अविवाहित होते. तिघांना जाग यायच्या आधीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याचे रहिवासी म्हणाले. ‘आग लागली तेव्हा आम्ही त्यांना खाली येण्यासाठी हाका मारल्या. आम्ही त्यांना अनेकदा फोन केला; पण त्यांनी कशालाच उत्तर दिले नाही. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचे मृतदेहच त्यांच्या घरातून बाहेर काढले, असे सांगताना इमारतीतील रहिवाशांना हुंदका आवरता येत नव्हता.

मरणाआधी रहिवाशांना जीवदान

इमारतीचा सुरक्षा रक्षक मनीष सिंग (वय ३२) शुक्रवारी रात्री ड्युटीवर होता. शनिवारी सकाळी तो घरी जाण्याच्या तयारीत होता; पण नेमके त्याच वेळी वरच्या मजल्यावरून आगीचे लोळ दिसायला लागले. मनीष लगेच इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लिफ्टने गेला. रहिवाशांना जिन्याने खाली जाण्यास मदत केली. धुरात आणि आगीत अडकलेल्या अनेक रहिवाशांना त्याने बाहेर काढले. आग वाढत असतानाही तो रहिवाशांना खाली जाण्यासाठी मदत करत होता. शेवटी आगीचा एक मोठा लोळ आला आणि मनीष स्वत:ला वाचवू शकला नाही.

आजीला वाचवायला गेलेली तनीषा जखमी

दहावीत शिकत असलेली तनीषा सावंत आणि तिचे कुटुंबीय आगीची माहिती मिळताच घरातून बाहेर पडले. तिचे वडील गणेश सावंत तोपर्यंत काही रहिवाशांना वाचवायला गेले. खाली येत असताना तनीषाला तिची आजी दिसली नाही. आजी वर घरातच राहिली असे वाटून तनीषा लिफ्टने १३ व्या मजल्यावर गेली; पण तिथेही आगीचा धूर पसरलेला होता. आजीला शोधता शोधता तनीषा त्या धुरात घुसमटली. सध्या तिच्यावर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश सावंत यांची अविरत मदत

तनीषाचे वडील गणेश सावंत १३ व्या मजल्यावर राहतात. आगीची माहिती मिळताच त्यांनी कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यांना पायऱ्यांनी खाली जायला सांगून ते इतर रहिवाशांना वाचवायला गेले. त्यांनी जवळपास ४० पेक्षा जास्त रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. चालू न शकणाऱ्या अनेक वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना त्यांनी पाठीवर उचलून इमारतीतून बाहेर काढले. त्यांची मुलगी तनीषा मात्र धुरात घुसमटली. तिला रुग्णालयात दाखल करून ते पुन्हा रहिवाशांना वाचवायला दिवसभर धावपळ करत होते. ‘एवढी आग मी पहिल्यांदाच जवळून पाहिली. आगीमुळे इतका धूर झाला होता, की डोळे उघडणे आणि श्वास घेणे शक्य होत नव्हते; पण रहिवाशांना वाचवणेही तितकेच महत्त्वाचे होते,’ असे ते म्हणाले.

रहिवासी नसूनही अनेकांना वाचवण्यात यश

कमला इमारतीच्या जवळच असलेल्या एका मंदिरात परिसरातील रहिवासी रवी बावकर आले होते. ते म्हणाले, की मी खाली मंदिराजवळ आलो तेव्हा नुकतीच आग लागली होती. मग मी आणि काही रहिवासी मदतीसाठी पुढे सरसावलो. रहिवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. रस्त्याच्या पलीकडेच भाटिया रुग्णालय असल्याने शक्य होईल त्यांना असेच उचलून तिथे नेले. किती जणांना बाहेर काढले आणि रुग्णालयामध्ये नेले नेमके माहीत नाही; पण तिथल्या खाटा भरेपर्यंत आम्ही त्यांना दाखल करत गेलो.

आमची हिंमत झाली नाही

इमारतीच्या ए विंगमध्ये राहणाऱ्या काही महिलांनी सांगितले, की आग लागलेला डक्ट आमच्या बाजूच्या स्वयंपाकघराजवळच आहे. त्यामुळे आगीची माहिती मिळताच आम्ही जसे होतो तसेच बाहेर आलो. घरात, स्वयंपाकघरात जाऊन यायचीही हिंमत होत नव्हती. १२ व्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, की आगीची माहिती मिळताच आम्ही आहे त्याच स्थितीत घराबाहेर पडून खाली आलो. मोबाईल घरीच राहिले. आम्ही सुखरूप असल्याचेही नातेवाईकांना सांगता येत नव्हते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT