mumbai sakal
मुंबई

Mumbai : तलाव की हा नाला; खंबाळपाडा तलावातील दुर्गंधीने नागरिक हैराण

ठाकुर्ली भोईरवाडी परिसरात खंबाळपाडा तलाव आहे. या तलावात गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात गणेश व देवीचे विसर्जन होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाकुर्लीतील भोईरवाडी येथील तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. येथील पाण्यात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी दुषित झाले आहे. त्यातच तलावातील काही मासे मृत पावल्याने त्यांना दुर्गंधी सुटून परिसरात देखील त्याची दुर्गंधी सुटली आहे.

तलावातील पाण्याला देखील वास मारत असल्याने परिसरातील नागरिकांना आपले दारे खिडक्या बंद करुन बसावे लागत आहे. उन्हामुळे आधीच उकडत असताना या दुर्गंधीने आणखी नागरिक हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार रहिवासी करतात.

ठाकुर्ली भोईरवाडी परिसरात खंबाळपाडा तलाव आहे. या तलावात गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात गणेश व देवीचे विसर्जन होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्याच्या घडीला तलावातील पाणी आटले आहे. या तलावात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत आहे. तसेच काही नागरिक कचरा देखील टाकत आहे.

यामुळे तलावातील पाणी दुषित झाले आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून तलावातील काही मासे हे मृत पावले आहेत. मासे मृत पावून ते तलावाच्या काठाला येऊन सडल्याने त्यांची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. मासे कसे मेले याविषयी काही ही माहिती अद्याप समजलेली नाही.

परंतू त्यामुळे घाणेरडा वास परिसरात पसरल्याने सामाजिक कार्यकर्ते कॉ. काळू कोमस्कर यांसह स्थानिक नागरिकांनी पालिकेचे प्रभाग अधिकारी भरत पाटील यांच्याकडे याविषयी तक्रार केली.

त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना याठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्याचे आदेश दिले. फवारणी करण्यात आल्यानंतर दोन दिवस कमी वास आला परंतू परत या पाण्याला वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

तलावातील पाणी उपसा करुन तसेच गाळ काढून तलावाची स्वच्छता केली गेली पाहीजे. पाण्याला दुर्गंधी सुटली असून ते हिरवे देखील झाले आहे. यामुळे परिसरात साथ रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भटके कुत्रे तलावातील घाणीतील कचरा, मृत मासे हे बाहेर आणून खात आहेत. या दुर्गंधीमुळे आम्हाला घराचे दारे खिडक्या बंद करुन बसावे लागत आहे. पालिका प्रशासनाने तलावाची स्वच्छता करण्याचे मनावर घ्यावे अशी आमची इच्छा आहे.

काळू कोमस्कर, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT