मुंबई : बीडीडी (BDD) चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चिती करण्याची सोडत २० ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार होती; मात्र ऐनवेळी म्हाडाच्या (Mhada) मुंबई (Mumbai) मंडळाने ही सोडत रद्द करत असल्याचे रहिवाशांना कळविले आहे. यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष पसरला असून प्रकल्पाचे काम सुरळीत होण्यासाठी विभागवार समन्वय समिती गठीत करण्याची मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी केली आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडाकडे सोपविली आहे. त्यानुसार म्हाडाने वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रकल्पाच्या इमारत क्रमांक ३० व ३१ मधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात येणार आहे. संक्रमण शिबिरात पाठवताना त्यांना प्रस्तावित पुनर्वसन इमारतीमधील सदनिका क्रमांक देण्यात येणार आहे.
त्यासाठी कायदेशीर करारनामा म्हाडा करणार असून यासाठी सदनिका क्रमांक निश्चितीसाठी सोडत काढण्यात येणार होती. यावेळी काही रहिवाशांनी एक हून अधिक घरे असल्याने त्याचे सोडतीमार्फत होणारे वाटप चुकीचे होईल, असे निदर्शनास आणून दिले. रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत मंडळाने २० ऑक्टोबरला काढण्यात येणारी सोडत रद्द केल्याची माहिती माने यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.