Accident News esakal
मुंबई

Mumbai Lift Collapsed : विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, एक ठार; काही कामगार अडकले

विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

Parking Lift Collapsed In Mumbai Vikroli Area : मुंबईतील विक्रोळी परिसरात लिफ्ट कोसळून भीषण अपघात झाला आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, काही कामगार लिफ्टखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील विक्रोळी परिसरात सिद्धीविनायक सोसायटीची ही पार्किक लिफ्ट असून, इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून ही लिफ्ट अचानक कोसळल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३ व्या मजल्यावरू कोसळली.

घटनेवेळी लिफ्टमध्ये चार कामगार बसलेले होते. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून, इतर तीन कामगारांना वाचवण्यात स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

दरम्यान, इमारतीत सुरू असलेल्या लिफ्टचे काम अनाधिकृत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT