Mumbai  
मुंबई

Mumbai : मुंबईतील १५ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर; भाडेकरू, रहिवाशांना नोटिसा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका दरवर्षी मुंबईतील धोकादायक इमारतीची यादी जाहीर करते. यंदाच्या वर्षीही म्हाडाने केलेल्या सर्व्हेक्षणात मुंबईतील १५ इमारती धोकादायक आढळून आल्या आहेत. यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या इमारतींमध्ये गेल्यावर्षीच्या ५ इमारतींचा समावेश आहे.

या इमारतीतील नागरिकांनी इमारत दुरुस्ती मंडळाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील  मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या १५ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ इमारतींचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या  १५ अतिधोकादायक उपकरप्राप्त  इमारतींमध्ये मागील वर्षी जाहीर केलेल्या ७ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये ४२४ निवासी व १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी आणि भाडेकरू आहेत.  मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार १५५ निवासी भाडेकरू आणि रहिवाशांनी स्वतःच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे.

तर आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर उर्वरित इमारतींमधील भाडेकरु  आणि रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २२२ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहितीचे मंडळातर्फे देण्यात आली आहे.        

मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या पारिजनांच्या  सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करावे.

- म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

मागील वर्षीच्या यादीतील इमारती

१) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर  

२) इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट 

३)  इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट

४) इमारत क्रमांक  ३८७-३९१ बदामवाडी, व्ही .पी. रोड

५) इमारत क्रमांक  ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगावचौपाटी 

६)इमारत क्रमांक  १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग१

७)अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ    

यंदाच्या वर्षी यादीत आलेल्या इमारती

१) इमारत क्रमांक ६१-६१ए , मस्जिद स्ट्रीट 

२)  इमारत क्रमांक २१२ जे पांजरपोळ लेन 

३)इमारत क्रमांक १७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी 

४)इमारत क्रमांक २-४-६ नानुभाई देसाई रोड,  मुंबई 

५)  इमारत क्रमांक १-२३  नानुभाई देसाई रोड, मुंबई

६)  इमारत क्रमांक  १७ नारायण निवास , निकटवाडी 

७) इमारत क्रमांक  ४० कामाठीपुरा ४थी गल्ली  

८) इमारत क्रमांक  ३५१ ए, जे एस एस रोड मुंबई      

नियंत्रण कक्ष

मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष, रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९ 

मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई.दूरध्वनी क्रमांक २२६९४७२५/२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT