AC Local Sakal
मुंबई

Mumbai Local: एसी लोकलमधील फुकट्यांविरोधात प्रशासन आक्रमक; ११५ कोटींचा दंड वसूल

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या आठ महिन्यात २. ९४ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ११५ कोटी रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ३० कोटी ६ लाखांचा दंडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे साध्या लोकलच्या तुलनेत एसी लोकलमध्ये विना तिकिट प्रवाशांची संख्या ६८ टक्यांनी वाढली आहे.

मुंबईच्या लोकल मध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशी वाढत असल्याने रेल्वे विभागासाठी मोठी डोके दुखी ठरत होती. मात्र आता लोकलच्या फुकट्या प्रवाशांना मुसक्या आवरण्यासाठी पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते.

पश्चिम रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत २ लाख ९४ हजार विना तिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे, ज्यामधून ११५ कोटी ७१ लाख रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर ३० कोटी ६ लाखांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून आकारण्यात आला.

उपनगरीय रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, वेळेची बचत करण्यासाठी,गडबड आहे अशा विविध कारणांमुळे प्रवासी तिकिट न काढता लोकलने प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेचे तिकिट तपासनीस दंडात्मक कारवाई पश्चिम रेल्वेने हाती घेतली आहे.

त्यामुळे एकट्या नोव्हेंबर महिन्यात उपनगरीय रेल्वे मार्गावर ९४ हजार विना तिकिट प्रवाशांकडून ५ कोटी ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एसी लोकलमध्ये ४४ हजारांपेक्षा जास्त अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला .या प्रवाशांकडून १४३ .४३ लाखांचा दंड जमा करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा दंड ६८ टक्यांनी जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT