Mumbai Local Crime sakal
मुंबई

Mumbai Local Crime: लोकलमधुन सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल फोन खेचला

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: अज्ञात लुटारूने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्‍या हातातील २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल खेचून चोरी केल्‍याची घटना शुक्रवारी सकाळी सानपाडा रेल्वेस्थानकात घडली.

वाशी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महेश डुगर सिंग (वय ५९) हे उलवे सेक्टर-१९ मध्ये राहण्यास असून ते नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. मानखुर्द येथे नेव्हीचा दवाखाना असल्याने महेश सिंग हे शुक्रवारी सकाळी मानखुर्द येथील दवाखान्यात औषधे आणण्यासाठी गेले होते. औषधे घेतल्यानंतर त्यांनी उलवे येथे परतण्यासाठी मानखुर्द येथून पनवेल लोकल पकडली होती.

सकाळी ११ वाजता सदर लोकल सानपाडा रेल्वेस्थानकात थांबून जुईनगरच्या दिशेने निघाली असताना, सदर लोकलच्या डब्यामध्ये असलेल्या चोरट्याने महेश सिंग यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन केले. यावेळी लोकलने वेग घेतल्याने महेश सिंग यांना काहीही करता आले नाही. त्यानंतर त्यांनी वाशी रेल्वे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT