Central Railway 
मुंबई

Mumbai Local News: अखेर तीन दिवसांचा मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक संपला! सीएसएमटीवरुन लोकल सेवा सुरु

Mega Block on the Central Railway: अखेर तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरु असलेला मेगा ब्लॉक संपला आहे. सीएसएमटीवरुन लोकस सेवा सुरु झाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- अखेर तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरु असलेला मेगा ब्लॉक संपला आहे. सीएसएमटीवरुन लोकस सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून हाल सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही काहीशी सुखावणारी बातमी आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्यात आलीये.

मध्य रेल्वेवरच्या मुख्य लाईनवर ६३ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेवरील सीएसएमटीच्या फ्लाट क्रमांक १० आणि ११ वर विस्तारिकरण आणि ठाण्यातील स्टेशनवरील पाच आणि सहा फ्लाट क्रमांकाच्या रुंदीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतलं होतं. त्यानंतर आज दुपारी दोन्ही ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर लोकल सेवा सुरु झाली आहे.

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला होता. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द करण्यात आल्या. यामुळे ३३ लाख प्रवाशांचे हाल झाले. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ३०/३१ मे च्या मध्यरात्रीपासून ते २ जून पर्यंत ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला होता. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तार करण्यासाठी ३०/३१ मे च्या मध्यरात्री ते २ जून च्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला.

मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. मध्य रेल्वेच्या या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली यावेळी आंदोलन देखील झाले.

मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था करावी, मासिक पास धारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT