Local Train 
मुंबई

Mumbai Local : महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली! महिला सुरक्षेसंदर्भात लोहमार्ग पोलिस सक्रिय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला प्रवाशांच्या विनयभंगाच्या घटनेत वाढ झाल्याने लोहमार्ग पोलिसांनी महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली आहे. याशिवाय महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

पनवेल-नेरुळ दरम्यान धावत्या लोकलमध्ये १४ जून २०२३ रोजी एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. तर, २० जून २०२३ रोजी राममंदिर रेल्वे रुळांलगत चारचाकी शिकवण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. याशिवाय महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून

लोहमार्ग पोलिसांनी महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली आहे. याशिवाय जनजागृती कार्यक्रम ही लोहमार्ग पोलिसांनी हाती घेतला आहे.महिलांच्या डब्यांमध्ये पोलिसांची उपस्थिती यापूर्वी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत होती. मात्र आता,लोकल ट्रेनमधील महिला डब्यात पोलिसांची ड्युटीचे तास रात्री ९ ते सकाळी ९वाजेपर्यंत करण्यात आले अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar New Rules : आता आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय; नवा नियम कशामुळे लागू?

Ajay Murdia: चित्रपट निर्माते भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करणारे उद्योजक अजय मुरडिया नेमके कोण? मोठे दावे अन् महत्त्वाची माहिती समोर

नेहरूंनी 'वंदे मातरम्'ऐवजी 'जन-गण-मन' राष्ट्रगीत म्हणून का निवडलं? ७७ वर्षांपूर्वी काय भूमिका मांडलेली? वाचा

Latest Marathi News Update : केदारनाथमधील पूरामध्ये मृत पावलेला व्यक्ती निघाला जिवंत.....पुण्यातील मनोरुग्णालयाकडून त्या रुग्णाचे कौटुंबिक पुनर्वसन

INC आता IMC बनलंय, नेहरुंमुळे वंदे मातरमचे तुकडे; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर घणाघात

SCROLL FOR NEXT