मुंबई

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Mumbai News: प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ६) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे :

कुठे : ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

दुसरीकडे सीएसएमटी, दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. तर सीएसएमटी दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे : पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा व सीएसएमटीहून येथून पनवेल, बेलापूरकडे येणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दुसरीकडे पनवेलहून ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणेहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही रद्द असणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

..

आज पश्‍चिम रेल्वे मार्गावर १० तासांचा रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ५) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान पाचव्या रेल्वे मार्गावर रात्री ११ ते सकाळी नऊ असा १० तासांचा तर कांदिवली ते गोरेगावदरम्यान अप जलद मार्गावर रात्री ११ ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत असा साडेचार तासांचा ब्‍लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्‍लॉकदरम्यान बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप जलद मार्गावरून लोकल अप धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तसेच, काही लोकल रद्द तर काही लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. पाचव्या मार्गावरील सर्व मेल-एक्सप्रेस अंधेरी ते बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT