मुंबई

Mumbai Local News: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांना अशा प्रकारे सहन करावा लागत आहे त्रास

रेल्वे प्रवासी एकता महासंघाने मध्य रेल्वेच्या प्रधान परिचालन प्रबंधकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: कल्याण-कसारा मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्याने लोकल सेवेवर ताण चांगलाच वाढला आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कल्याण- कसारा मार्गावर लोकल फेऱ्या वाढवाव्यात याच बरोबर कसारा स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांचा रद्द केलेला थांबा पूर्ववत करावा, यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने मध्य रेल्वेच्या प्रधान परिचालन प्रबंधकांना निवेदन दिले आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावरील टिटवाळा, खडावली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा आदी शहरांत मोठ्या प्रमाणावर गृहसंकुल उभारले जात आहेत.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या महत्त्वाच्या शहरात गर्दी वाढल्याने दाट झाडीत विस्तारली गेल्याने अनेक चाकरमानी आता ग्रामीण भागाला पसंती देऊ लागले आहेत. (kalyan kasara local news)

गेल्या सहा वर्षांत एकही लोकल गाडी कल्याण- कसारा मार्गावर वाढवली गेली नाही. लोकसंख्या वाढली; मात्र लोकल फेऱ्यांच्या व्याप्ती वाढली नसल्याने नेहमीच्या गर्दीने सकाळ- संध्याकाळ प्रवाशांना विशेषतः नोकरवर्गाला श्वास घेणे मुश्किल झाले आहे. त्यात नेहमी उशिरा धावणाऱ्या लोकल सेवेमुळे प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. आदी बाबी रेल्वे प्रशासनाने लक्षात घेत कल्याण- कसारा मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.(need for more mumbai - kasara local)

तसेच अप मार्गारील सेवाग्राम एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस आणि गोरखपूर एक्सप्रेस या गाड्यांचा कोविड काळात कसारा स्थानकात रद्द केलेला थांबा पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख व उपाध्यक्ष जितेंद्र विशे, लता आरगडे व जगदीश धनगर यांच्यासहीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.(kalyan karasa express news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT