Harbour Local sakal
मुंबई

Mumbai local News : मुंबईत तब्बल इतक्या ठिकाणी येणार लोकलच्या वेगावर मर्यादा!

Mumbai local News :

Chinmay Jagtap

Mumbai local News : मध्य रेल्वेवर मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे काही ठिकाणी खबरदारी म्हणून लोकलच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. साधारण मुंबई विभागात ५० ठिकाणी लोकलच्या वेगावर मर्यादा आल्याने लोकल विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दररोज कार्यलयात पोहचण्यासाठी लेटमार्क बसत आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. याशिवाय रात्री लोकल सेवा बंद झाल्यावर रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात.

त्यामुळे खबरदारी म्हणून लोकलच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, कसारा, पनवेल अशा ५० ठिकाणी ही वेगमर्यादा घातली आहे. त्यामुळे मोटरमनला त्या ठिकाणावर लोकल घेऊन जात असताना लोकलची गती कमी करावी लागते. परिणामी, लोकल विलंबाने धावतात. वेगमर्यादा घातलेल्या ठिकाणचे काम पूर्ण होताच ही मर्यादा मध्य रेल्वेकडून काढून घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लोकलच्या १८१० फेऱ्या होतात. याशिवाय मेल-एक्स्प्रेसची वाहतूकही सुरू असते.

त्यातच रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वेगमर्यादा घालण्यात येते, परंतु वेगमर्यादा घालताना लोकलच्या वेळापत्रकात त्याची वेळ समाविष्ट केली जात असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी सांगतात.

सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल लोकल प्रतितास ९० ते ११० किमी वेगाने धावू शकतात, परंतु मध्य रेल्वेने रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी कामे हाती घेतलेली असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव लोकल ट्रेनला प्रतितास १५, ३०, ५०, ७० किमी वेगाची वेगमर्यादा घातली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT