मुंबई

Mumbai Local News: ..तर चर्चगेट स्थानकावर येणार जप्ती? वाचा नक्की काय आहे प्रकरण 

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: एका कंपनीचे पैसे थकवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला मोठा दणका दिला आहे. तीन कोटी ९५ लाख ९४ हजार ७२० रुपये चार आठवड्यांत भरा; अन्यथा चर्चगेट रेल्वेस्थानकाची इमारत जप्त करू; असा इशारा उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिला आहे.


चर्चगेट येथील इमारतीत साहित्य, मालाची हाताळणी व इतर काम करण्याचे कंत्राट के. पी. ट्रेडर्स या कंपनीला १९९८ मध्ये दिले होते. त्यानंतर रेल्वे व संबंधित कंपनीत वाद झाला. कंपनीने याप्रकरणी लवादाकडे दाद मागितली. त्यानंतर लवादाने २०१५ मध्ये कंपनीच्या बाजूने निकालही दिला. तीन कोटी ९५ लाख ९४ हजार ७२० रुपये देण्याचे रेल्वेला आदेश दिले; मात्र हे पैसे न मिळाल्याने के. पी. ट्रेडर्सने उच्च न्यायालयात धाव घेतली.

याबाबत न्या. अभय आहुजा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी न्यायालयाकडे मुदत मागितली; मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत चार आठवड्यांत रक्कम देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT