dadar name Chaityabhoomi  sakal
मुंबई

Chaityabhoomi : दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करा; प्रमुख राजकीय पक्षाची मागणी

डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादर येथे राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून स्थानकाचे नामांतर केले. त्याच धर्तीवर दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे करावे, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली.


दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची आंबेडकरी अनुयायांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायकवाड यांनीही चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले. त्या वेळी या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी दादर स्थानकाला चैत्यभूमी असे नाव द्यावे अशी मागणी केली.

ओशिवरा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असे नाव दिले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादर येथे राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT