Mumbai Local news Central Railway Mega Block today local cancel Know in detail sakal
मुंबई

Mumbai Local: मुंबई लोकलचा रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ वृत्तसेवा

उपनगरी रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, २८ जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर; तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

• कुठे : माटुंगा ते मुलुंड, अप-डाऊन जलद मार्ग

◆ कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५

◆ परिणाम : ब्लॉकदरम्यान

सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे: पनवेल ते वाशी, अप-डाऊन मार्ग

◆ कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या आणि ठाणे येथून पनवेलकरिता सुटणाऱ्या लोकलही रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

◆ कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, अप-डाऊन धीमा मार्ग

◆ कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत

◆ परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लॉकदरम्यान अॅप-डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT