Mumbai Local Train esakal
मुंबई

Mumbai Local Train : सरकता जिना उलटा फिरला, दिवा स्टेशनवर उडाला गोंधळ

ठाण्यातल्या दिवा स्थानकामध्ये एक सरकता जिना उलट्या दिशेला फिरल्याची घटना घडली आहे. काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला यासंबंधीची माहिती दिली. त्यापूर्वीच प्रवाशांनी एमर्जन्सी बटन दावून जिना थांबवला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः ठाण्यातल्या दिवा स्टेशनवर एक अजबच प्रकार घडला आहे. वरच्या दिशेला जाणारा सरकता जिना अचानक खालच्या दिशेला सरकू लागला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाची थट्टा उडवली आहे.

मुंबईमध्ये लोकल ट्रेनचं जाळं असल्यामुळे गर्दीसुद्धा कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर नेहमी अप्रिय घटना घडत असतात. काही वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन स्थानकावर अफवेमुळे प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली होती. पावसाळ्यात तर पूल कोसळण्याच्या घटना घडत असतात.

यातच आता ठाण्यातल्या दिवा स्थानकामध्ये एक सरकता जिना उलट्या दिशेला फिरल्याची घटना घडली आहे. काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला यासंबंधीची माहिती दिली. त्यापूर्वीच प्रवाशांनी एमर्जन्सी बटन दावून जिना थांबवला होता.

सरकत्या जिन्यांवर अनेकदा भरपूर प्रवाशी वर-खाली करत असतात. त्याची मर्यादा लक्षात घेतली जात नाही की जिन्यांची देखभालही केली जात नाही. रेल्वे पोलिस अथवा कर्मचारी असे प्रकार रोखण्यासाठी तैनात पाहिजेत, परंतु कुणाचंच याकडे लक्ष नसतं. त्यामुळे असे प्रकार घडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT