Viral Video  Sakal
मुंबई

Mumbai Local : खचाखच भरलेल्या लोकलच्या केबीनमध्ये बसून डोंबिवलीकरांचा प्रवास; पाहा Viral Video

केबीनमध्येसुद्धा प्रवाशांची चांगलीच गर्दी झाल्याचं दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील किंवा मुंबईला गेल्यानंतर एकदातरी लोकलने प्रवास केला असेल. पावसाळ्यात किंवा इतर दिवशी अनेकदा लोकलमध्ये प्रवाशांची तुडूंब गर्दी असते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून प्रवासी थेट ड्रायव्हरच्या केबीनमध्ये बसून प्रवास करताना यामध्ये दिसत आहेत.

मुंबईच्या डोंबिवली लोकलमधील हे चित्र असून लोकल ड्रायव्हरच्या केबीनमध्ये आठ ते दहा लोकं उभा राहिल्याचं दिसत आहे. मागच्या डब्यातही प्रवाशांची चांगलीच गर्दी झाल्याचं दिसत आहे. ड्रायव्हरच्या केबीनमध्ये कोण ड्रायव्हर आणि कोण प्रवासी हे सुद्धा कळत नाही. पण लोकलच्या डब्यात बसायला जागा नसल्यामुळे अनेकदा प्रवासी थेट केबीनमध्ये घुसत असतात.

दरम्यान, मुंबई लोकलमधील गर्दीचा अंदाज हा व्हिडिओ पाहून आपल्याला येईल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "तुम्हीही लोकलच्या कॉकपीठमध्ये बसून प्रवास करण्याचा अनुभव घेतलाय का?, ड्रायव्हर म्हणत असेल, ठीके तर मी जातो आता" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT