मुंबई

येत्या जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार: विजय वडेट्टीवार

पूजा विचारे

मुंबईः  ३१ डिसेंबरनंतर लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकार येत्या नव्या वर्षात मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कोरोना सारख्या महामारीचं संकट पाहता गेल्या ९ महिन्यांपासून मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र त्यातच आता विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य केलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

सध्या महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होताना दिसतोय. त्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार करत आहे. लोकल सुरु करण्या संदर्भातली तयारीही सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर येतेय. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असं मला वाटतं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

तसंच डिसेंबरचे साधारण १५ दिवसांमध्ये घटती कोरोनाची रुग्ण संख्या, नव्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली जाईल. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर नववर्ष, जानेवारीमध्ये आम्ही लोकल रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल, असं ते पुढे म्हणालेत. 

कोरोना व्हायरस सध्या नियंत्रणात आला आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे कोरोना रुग्ण अचानक वाढले. त्यामुळे तशी परिस्थिती मुंबई शहरात उद्धभू नये. म्हणून पुढचे १५ दिवस नियोजन आणि चर्चा केली जाईल. तसंच मास्क न घालता कोणी ट्रेनमध्ये चढू नये, गर्दी कमी करण्यासाठी नियोजन, पोलिस तसंच इतर मनुष्यबळाची मदत या सर्व गोष्टींची चाचपणी पूर्ण झाली आहे. तयारी पूर्ण झाली आहे. नव्या वर्षात पहिल्या तारखेपासून लोकल सुरु करण्यासंबंधी विचार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Mumbai local train vijay wadettiwar chance start from january 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT