मुंबई

'या' महिन्यात मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्या धावण्याची शक्यता

पूजा विचारे

मुंबई- कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई शहराला याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. अशातच कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लाइफलाईन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. सध्या अनलॉकच्या काळात रेल्वे प्रशासनानं १५ जूनपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. मात्र कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत तो पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आता लवकरच उपनगरी रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हळूहळू रेल्वे सेवा पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. उपनगरी रेल्वेगाड्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यासंदर्भातली माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी  प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळं रेल्वेगाड्या सुरु झाल्यास अनेकांना दिलासा मिळणारेय. 

रेल्वेचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने यात राज्य सरकारला काहीच करता येत नाही. मात्र केंद्र सरकार याबाबत विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्या १५ जूनपासून अल्प प्रमाणात सुरू झाल्या असल्या तरी सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच त्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर लोकल धावत असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रवास करत आहेत. सुरुवातीला कमी लोकल सेवेत आणण्यात आल्या होत्या. मात्र लोकलमध्ये प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

लोकल फेऱ्या वाढवल्या

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात मर्यादित प्रवाशांसाठी ७०० लोकल फेऱ्या धावत आहे. १ जुलैपासून मध्य रेल्वेवर १५० आणि पश्चिम रेल्वेवर १४८ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या. या फेऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी नसून केवळ राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रवाशांसाठी असणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. प्रवाशांना तूर्तास अत्यावश्यक सेवेच्या ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार एका लोकलमधून ७०० प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.

mumbai local trains suburban serivces will start central government august

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

Shravan Jivati Pujan 2026: जिवतीचा कागद, गूळफुटाण्याचा नैवेद्य अन् चार शुक्रवार; काय असते श्रावणात केली जाणारी जिवतीची पूजा?

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Virar News : बोरीवली स्थानकावर थांबला प्रवास, पण सुरू झाली नव्या आयुष्याची वाट

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

SCROLL FOR NEXT