मुंबई

Mumbai local Viral Video : मुंबई लोकलमधला स्टंटमॅन झाला वायरल ; पोलिसांनी दिली कारवाईची ग्वाही

सकाळ डिजिटल टीम

Mumbai local Viral Video : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये नागरिक नेहमीच जीव धोक्यात घालून प्रवास करताना पाहायला मिळतात.गर्दीच्या वेळी लोकलमधून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. मात्र एका रिकाम्या लोकलमध्ये एक तरुण धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.

कुर्ला ते मानखुर्द (हार्बरलाईन) या मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण धोकादायक स्टंट करताना दिसून येत आहे. धावत्या लोकलमध्ये हा तरुण लोकलच्या पायऱ्यांवर स्टंट करताना पाहायला मिळत आहे

या व्हिडिओमध्ये हा तरुण लोकलच्या पायऱ्यांवर उभा राहून प्रवास करत आहे. यामध्ये असेही समजत आहे की हा डब्बा रिकामा आहे. रिकामा डबा असतानाही हा तरुण जोखीम घेऊन प्रवास करत आहे.

या ठिकाणी जर हा डबा रिकामा नसता तर नागरिकांनी नक्कीच तरुणाला हे करण्यापासून रोखले असते. मात्र या बेजाबदार तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जसवंत सिंग या व्यक्तीने या तरुणाचा व्हिडिओ काढला असून मुंबई लोकलमध्ये सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आणला आहे. या व्हिडिओला पाहून आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांनी मुंबई डिव्हिजन यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT