Mumbai Virar Local 
मुंबई

Mumbai Virar Local: विरारच्या महिला हुशार, सीटसाठी अनोखा फंडा!

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन गर्दीमुळे अनेक लहान मोठे वाद पहायला मिळतात.

कार्तिक पुजारी

मुंबई,ता.१५: उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन गर्दीमुळे अनेक लहान मोठे वाद पाहायला मिळतात. अशात विरार लोकल म्हटलं तर लोकलमध्ये शिरण्यापासून बसायला मिळेपर्यंत महिला आणि पुरुषांच्या डब्यात वाद उफाळून येतात. या रोजच्या वादविवादांना कंटाळून विरारच्या महिला प्रवाशांनी चक्क डब्यात एक मजेशीर पोस्टर लावले असून हे पोस्टर आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण होत आहे.

विरार लोकमधून रोज शेकडो प्रवासी महिला प्रवास करतात. ज्यांना अगदी विरारपासून दादर येईपर्यंत काही तास गर्दीत धक्के सहन करीत उभे राहून प्रवास करावा लागतो. विरार स्थानकावर लोकल खाली होत असूनही नालासोपारा डाऊन करणाऱ्यांमुळे अनेकांना बसायला मिळत नाही. रोजच्या या समस्येला कंटाळलेल्या महिला प्रवाशांनी विरार लोकलमध्ये सीट मिळण्यासाठी मजेशीर पोस्टर चिकटवले आहे.

लोकलच्या एका डब्यात एक पोस्टर चिकटवल्याचे दिसते आहे. या पोस्टरवर नालासोपाऱ्यातील महिला आणि मुलींना विनंती करीत लिहिलेय की, "खासकरून नालासोपारा डाऊन महिला आणि सर्व मुलींसाठी, कृपया माणुसकी म्हणून तुमच्यासमोर उभ्या असतील त्यांना बसायला द्यावे. -आदेशावरून सर्व कामकाजी महिलाप्रवासी".

दरम्यान, हे पोस्टर आता सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण- लोकलमधील सीटसाठी अशा हटके प्रकारे विनंती करण्याची ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, dimplewalii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुन्हा चर्चा मेलोडीची! मोदींनी मेलोनी यांना दिलं स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ बनवत म्हणाल्या...

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! पुण्यात तिसरी हत्या... ४ पिढ्यांचा इतिहास

जंजिरा, सिंधुदुर्ग २६ मे पासून बंद; वॉटर स्पोर्टही बंद ठेवण्याचे आदेश!

Ghaziabad Accused Bail Celebration : जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या आरोपीवर उधळली फुले, जल्लोषात काढली मिरवणूक; संतापजनक प्रकार

Income Tax Officer Success Story: आधी ना 'इन्कम' होती ना 'टॅक्स'; रीलस्टार तरुण बनला थेट इन्कम टॅक्स ऑफिसर; पाहा ९ वर्षांच्या संघर्षाची रंजक गोष्ट!

SCROLL FOR NEXT