mumbai 
मुंबई

मुंबईत सोमवारी सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन; जाणून घ्या, काय सुरू? काय बंद?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईसह राज्यात पूर्णत: लॉकडाऊन राहाणार आहे. यात फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरु राहाणार असून खासगी वाहानांच्या वावरावरही बंदी आहे. सबळ कारणाशिवाय अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही. हे नियम मोडणाऱ्यांवर साथ रोग नियंत्रण कायदा आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वॉईन शॉप बंद राहाणार असले तरी बारमधून मद्याची होम डिलेव्हरी करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मुंबईसह राज्यभरात साेमवार ते शुक्रवारी मिनी लॉकडाऊन आणि शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पूर्ण लॉकडाऊन होणार आहे. या काळात फक्त अत्यावश्‍यक सेवा, वैद्यकिय सेवा, वित्त सेवा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच,खासगी वाहानांचाही वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्‍यक सेेवेतील कर्मचाऱ्यांना खासगी बसेसचा वापर करता येणार आहे.अशी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. या काळात लोकल ट्रेन, बेस्ट बसेस,रिक्षा,टॅक्सी सुरु राहाणार आहेत.

हॉटेल मधूनमद्याची होम डिलेव्हरी

बारमधून खाद्य पदार्थांची तसेच मद्याची होम डिलेव्हरी करता येणार आहे. मात्र, यासाठी अबकारी विभागाचे नियम पाळावे लागणार असे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रात नमुद आहे. तर, महानगर पालिका उपहारगृह 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र,पूर्ण लॉकडाऊनच्या काळात फक्त होम डिलेव्हरी देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ग्राहकांना उपहारगृहात जाऊन पार्सल घेण्याची मुभा नसून मोबाईल ॲप्लिकेशन तसेच फोनवरुन ऑर्डर देता येणार आहे, असे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.

मोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल

डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये फक्त अत्यावश्‍यक सेवा

डिपार्टमेंटल स्टोअर्स मधील फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. यात, औषध, किराणामाल, भाजीपाला असे विभाग सुरु ठेवता येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला मोठा धक्का? PoK ला भारताशी जोडण्याची मागणी, ११० दिवसांपासून सुरुये आंदोलन

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT