Lok Sabha Election Esakal
मुंबई

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Lok Sabha Election: ठाण्यातून नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाणे लोकसभेवरून शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे सुरु होते. अशातच ही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यात पडली आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला आधीत सुरूवात झाली असली तरी देखील महायुतीने या जागांवर आपले उमेदवार दिलेले नव्हते. आज त्या नावांची आज घोषणा झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यापैकी कोणत्याही नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या सत्तांतरात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांना मोठे महत्व प्राप्त झाले. दरम्यान शिवसेनेच्या फुटीनंतर ताकत राखणे ही या दोन्ही गटांची प्राथमिकता राहणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपने आपला दावा करत इच्छुकांची यादीही पुढे केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने हा मतदारसंघ आपला असल्याने त्यांनीही जागा सोडण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT