Mumbai Loksabha sakal
मुंबई

Mumbai Loksabha: दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिंदेंना उमेदवार मिळेना, चर्चा फक्त नावांची

दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी त्यांच्या पती यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती | Shiv Sena Yamini Jadhav name is considered almost certain in South Mumbai. the name of her husband Yashwant Jadhav was discussed

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून शिंदे गटात फक्त संभाव्य नावांचीच चर्चा आहे. भाजपाने हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडला आहे, मात्र शिंदे गटाचा उमेदवार अद्याप ठरत नाही.

आमदार यामिनी जाधव यांचे नाव पुढे आले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार मिलिंद देवरा, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनसेचे बाळा नांदगावकर यांची नावे आता मागे पडली आहेत. या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी त्यांच्या पती यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून या नावांची चर्चा सुरू असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही.

तरीही प्रचार सुरू

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी या मतदारसंघात भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी गाठीभेटी आणि बैठका सुरू ठेवल्या आहेत. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचेही गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांनीही शिवडी भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. आता यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत आले आहे. यामिनी जाधव या शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे फक्त नावांचीच चर्चा आहे. महायुतीचा उमेदवार अद्यापही येथे ठरत नाही. मात्र यशवंत जाधव यांनीही या मतदारसंघात आपला प्रचार सुरू ठेवला असल्याचे दिसते.

ठाकरे गटाचे आव्हान

या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली असून त्यांनी या मतदारसंघात आपला प्रचार जोरदार चालू केला आहे. गाठीभेटींचा धडाका सुरू आहे. त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रचार यंत्रणा या मतदारसंघात राबविली आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात ताकद लावली आहे

राहुल नार्वेकरांची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दक्षिण मुंबईतून भाजपच्या राहुल नार्वेकरांनी तयारी सुरू केली होती. ते सुरुवातीपासूनच या मतदारसंघाचे दावेदार आहेत .भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही या ठिकाणी चर्चा होती. दक्षिण मुंबईत मराठी भाषकांची असलेली संख्या लक्षात घेता भाजपकडून राहुल नार्वेकर हेच उमेदवार असतील अशी शक्यताही होती. पण आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जातात

मिलिंद देवराही दावेदार

या मतदारसंघातून शिंदे गटाचे मिलिंद देवरा हेही इच्छुक आहेत. त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात सलग 40 वर्षे मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. हा मतदार संघ आपल्या ताब्यात रहावा, यासाठी मिलिंद देवरा प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनीही येथे मोर्चे बांधणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT