Crime sakal
मुंबई

Mumbai Thief : घरात लूट करून घरगडी गायब; आरोपी गुजरातहून अटकेत

घरातील दागिने, मौल्यवान वस्तू आणि लाखो रुपये लंपास करुन पळून गेलेल्या घरगड्याला दादर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

घरातील दागिने, मौल्यवान वस्तू आणि लाखो रुपये लंपास करुन पळून गेलेल्या घरगड्याला दादर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

मुंबई - घरातील दागिने, मौल्यवान वस्तू आणि लाखो रुपये लंपास करुन पळून गेलेल्या घरगड्याला दादर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. हंसपुरी गोस्वामी असे अटक आरोपीची नाव असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. गेले पाच वर्षांपासून सदर कुटुंबाकडे घरकाम करत होता.

लाखोंचा मुद्देमाल लंपास

प्रभादेवीतील विष्णू कुमार गुप्तालोंग त्याची पत्नी आणि मुलांसह 5 फेब्रुवारी रोजी सिलीगुडीला सुट्टी घालवायला गेले असताना त्यांच्या घरातील तिजोरी फोडून सोन्याचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा 27 लाखांचा मुददेमाल आरोपी लंपास करत पळून गेला. गुप्तालोंग कुटुंब 7 फेब्रुवारी रोजी सहलीहून घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळले. तिजोरी फोडलेली होती आणि घरगडी गोस्वामी बेपत्ता होता तसेच त्याचा फोनही बंद होता. पिडीत कुटुंबाने त्वरित दादर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

पोलीस कारवाई

पोलिसांनी गोस्वामीचा शोध सुरू केला. त्याच्या फोनचे लोकेशन पोलिसाना मिळाले. आरोपीच्या फोनचे शेवटचे लोकेशन गुजरातमधील बनासकांठा येथे सापडले जिथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून काही ग्रॅम सोने आणि 6.15 लाख रुपये रोख हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात आरोपीच्या मित्राने त्याला मदत केली असल्याचा पोलिसाना संशय आहे. आता त्याच्या मित्राचा शोध दादर पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT