Mahashivratri 2023 esakal
मुंबई

Mumbai : महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली पूर्व) येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाशिवरात्रीनिमित्त बेस्ट उपक्रमाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी विशेष बससेवा उपलब्ध केली आहे. यादिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली पूर्व) येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाशिवरात्री निमित्ताने १८ फेब्रुवारीला बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बसगाड्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी

बसमार्ग क्र. ५७ ( वाळकेश्वर ते पी.टी. उद्यान- शिवडी), बसमार्ग क्र. ६७ ( वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक ) या तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालविण्यात येतील.

अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे उप जनसंपर्क अधिकारी मनोहर गोसावी यांनी दिली. भाविकांनी या अतिरिक्त बससेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT