colours.jpg 
मुंबई

पोलिसांच्या समोर माहिममध्ये म्युझिकच्या तालावर जमावाने एकत्र साजरी केली रंगपंचमी

दीनानाथ परब

मुंबईच्या माहिम भागात आज नियम धाब्यावर बसवून रंगपंचमी साजरी करण्यात आली. कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने होळी सण साजरे करण्यावर निर्बंध घातले होते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र जमू नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते. पण तरीही माहिम भागात १०० ते १५० जणांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली. या गर्दीमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसवण्यात आले. 

कोणीही मास्क परिधान केले नव्हते. म्युझिकच्या तालावर अनेकजण नाचत होते. माहिम कोळीवाडा भागात अशा पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. जमलेल्या गर्दीमधील काही जणांनी पीपीई किट सुद्धा घातले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने जमलेल्या गर्दीला म्युझिक बंद करुन, घरी जाण्यास सांगितले, तेव्हा जमावाने त्याकडे दुर्लक्ष केलं. 

अखेर पोलीस उपायुक्त प्रणय अशोक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले, व त्यांनी हे नाचगाणे थांबवले. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने मागच्या आठवडयात सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बध घातले होते. घाटकोपरमध्ये निर्बंध असूनही रंगपंचमी साजरी करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. 

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली असून, वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सरकारने १५ एप्रिल पर्यंत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, धार्मिक मेळाव्यांवर बंदी घातली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Latest Marathi News Live Update : कुंद्रा दाम्पत्यावर फसवणुकीचे कलम

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

Narayangaon Crime : वारुळवाडी येथे मध्यरात्री घरफोडी; सहा तोळे सोनं व २५ तोळे चांदीचे दागिने लंपास!

SCROLL FOR NEXT