मुंबई

विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं मालाड दुर्घटनेचं कारण

विराज भागवत
  • इमारत अनाधिकृत होती पण दुर्घटना टाळता आली असती

मुंबई: शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. (residential structure collapsed) या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले. जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या (old building) आणि जर्जर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आणि महत्त्वाची माहिती दिली. (Mumbai Malad Building Collapse Police Vishwas Nangare Patil gives important updates)

नांगरे पाटील म्हणाले, "ही दुर्दैवी घटना आहे. या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टी केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे."

"जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आम्ही या घटनेबद्दलची माहिती घेत आहोत. जी इमारत कोसळली ते बांधकाम अनाधिकृत होतं. त्या बांधकामात काही स्ट्रक्चरल डीफॉल्ट्स (बांधकामातील त्रुटी) होत्या. तोक्तेचा तडाखा हा इमारतीला जेव्हा बसला तेव्हाच याची देखभाल दुरूस्ती केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती", अशी माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT