MMRDA sakal
मुंबई

Mumbai : मंडाले डेपोचे ७० टक्के काम पूर्ण; एमएमआरडीएची माहिती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) डी. एन.नगर ते मंडाले या मेट्रो मार्ग-२ब मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) डी. एन.नगर ते मंडाले या मेट्रो मार्ग-२ब मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेसाठी मंडाले येथे कारशेड उभारण्यात येत आहे. या कारशेडचे आत्तापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे ९६ टक्के पूर्ण झाली असून या टप्प्यातील १८ लाईनचे काम पूर्ण झाले आहे. २०२४पर्यंत मेट्रो मार्गिका २ ब पूर्ण करून नागरिकांचे सेवेत आणण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

मेट्रो २ ब मार्गिका 'डी एन नगर ते मंडाले' ही ३३७ किमी लांबीची मार्गिका एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्वाची मेट्रो मार्गिका आहे. या २३.६४ किमी लांबीच्या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोपे होणार आहे. या मार्गिकेसाठी मंडाले येथील ३१ एकर जागेत हा डेपो उभारण्यात येत आहे. या डेपोमध्ये सर्व गाड्यांमधील फेरबदल, सर्व किरकोळ वेळापत्रक आणि दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलण्यासाठी लिफ्टिंग आणि चाचणी, अवजड उपकरणांची दुरुस्ती यासह सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध असतील. यापैकी स्टेबलिंग कास्टिंग यार्ड टप्पा १'चे ९६ टक्के, स्टेबलिंग कास्टिंग यार्डचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर गाड्यांच्या चाचणीसाठी रुळांचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

तीन मजल्यांच्या सिम्युलेटर इमारतीची १०० टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. या इमारतीत तळमजल्यावर प्रवेशद्वार लॉबी, सबसिस्टम मेंटेनन्स सिम्युलेटर मॉड्यूल (SSMSM) रूम, फुल स्कोप ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटर (FSTDS) रूम (दुहेरी उंची), फुल स्कोप ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटर (FSTDS) यांचा समावेश आहे. निरीक्षण कक्ष, संगणकीय कक्ष, शौचालयांसह विद्युत कक्ष आणि पॅन्ट्री. पहिल्या मजल्यावर एक लॉबी, पाच सिम्युलेटर खोल्या, एक तंत्रज्ञान केंद्र, एक ई-लर्निंग सेंटर आणि ऑफिस स्पेस आहे. तिसऱ्या मजल्यावर लॉबी, पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, क्रू कंट्रोल रूम, टॉयलेट, पॅन्ट्री आणि खुले टेरेस यांचा समावेश आहे. २० प्रशिक्षणार्थी बसण्याची क्षमता असलेला कक्ष आणि इलेक्ट्रॉनिक घटक जोडण्यासाठी एक तांत्रिक कक्ष आहे. याठिकाणी मेट्रो पायलटना प्रशिक्षण दिले जाईल. याचसोबत इतर भागातून मेट्रोच्या संचलनावर देखरेख ठेवण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे.

प्रगतीपथावर असलेली कामे

  • कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण

  • स्टेबलिंग यार्ड फेज १ चे ९६ टक्के काम पूर्ण

  • स्टेबलिंग यार्ड फेज २ चे ३६ टक्के काम पूर्ण

  • जोडरस्ता आणि एलिव्हेटेड शंटिंग नेकचे काम प्रगतीपथावर

  • बल्ब एरिया आणि क्रॉस ओव्हर एरिया १०० टक्के काम पूर्ण

  • कोच अनलोडींग प्लँटफॉर्म १०० टक्के पूर्ण

  • डीसीसी, सीएसबी ७० टक्के

  • टेस्ट ट्रॅक उभारणी ७५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT