मुंबई

Video: मरीन ड्राइव्हवर दिसलं समुद्राचं रौद्र रूप

Cyclone Tauktae मुळे मुंबईत सोसाट्याचा वारा; अनेक ठिकाणी भलेमोठे वृक्ष कोसळले

विराज भागवत

मुंबई: अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या तौक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा मुंबईला सोमवारी बसला. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला (Heavy Rainfall) रविवार रात्रीपासूनच सुरूवात झाली. त्यानंतर सोमवारपासून मुंबईसह (Mumbai) रायगड (Raigad), ठाणे (Thane), पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये काही भागात ताशी 100 किलोमीटरपेक्षाही जास्त वेगाने वारा वाहण्यास सुरूवात झाली. मुंबई, रायगड या किनाऱ्यापासून 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात वादळाचा (Wind) जोर खूपच जास्त होता. दुपारी भरतीच्या वेळात तर समुद्राचं रौद्र रूप (Dangerous) पाहायला मिळालं. वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यामुळे पावसाळ्यात मुंबईतील सर्वात प्रेक्षणीय असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात लाटांनी कठडा ओलांडून थेट रस्त्यांपर्यंत उंच झेप घेतल्याचं चित्र दिसलं. (Mumbai Marine Drive Arabian Sea shows Rage Form Dangerous Video)

मरीन ड्राइव्हप्रमाणेच पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण असलेल्या मुंबईच्या जुहू बीचवरही समुद्राच्या लाटांचा प्रचंड आवाज ऐकायला मिळाला. दिवसभरात अनेक झाडं उन्मळून पडली. त्याचसोबत काहींच्या झाडांचे आणि वाहनांचे नुकसान झालं. मरीन ड्राईव्हप्रमाणेच जुहू बीचवरही लाटांचा जोर खूप असल्याचे दिसून आले.

जुहू बीचवर लाटांच्या आवाजाने थैमान घातलं. त्याचसोबत जुहू बीचजवळील रहिवाशी वस्त्यांमध्येही पाणी भरल्याचे चित्र दिसून आले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठी झाडं कोसळली. मुसळधार पावसामुळे अनेक सखळ भागात पाणी साचल्याचंही चित्र दिसून आलं.

राज्यात सरकार असलेल्या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पक्षांपैकी एक म्हणजे शिवसेना. शिवसेना पक्षाचं कार्यालय असलेल्या दादरमधील शिवसेना भवनसमोरही वादळाचा फटका दिसून आला. शिवसेना भवनसमोरच जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळली. इतकंच नव्हे तर वीजेचा खांबदेखील कोसळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT