mumbai-marine-drive
mumbai-marine-drive sakal media
मुंबई

Marine Drive : मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

मुंबई - मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. रस्ता ओलांडणाऱयांना प्रतिबंध करण्यासाठी बॅरियर्स लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मरीन ड्राईव्ह परिसरात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले होते.

प्रशासनाकडून मरीन ड्राइव्ह परिसरात निरनिराळ्या उपाययोजना देखील हाती घेण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा 'हमखास अपघात प्रवण क्षेत्रांचे' सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये निर्देशित ठिकाणी पादचाऱ्यांकडून रस्ता ओलांडण्याचे प्रकार रोखता यावे म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील पालिका प्रशासनाला विनंती केली आहे.

रस्ता दुभाजकांमध्ये 'कडे'

कुलाबा मधील पालिकेच्या ए विभागाच्या हद्दीतील मरीन ड्राईव्ह भागात, रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये फॅब्रिकेटिंग आणि रेलिंग बॅरियर्स लावण्यासाठीची प्रक्रिया विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. अपघातप्रवण भागात हे बॅरियर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली आहे. दुभाजकांमध्ये बॅरियर्सवरून रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, इतक्या उंचीचे हे फॅब्रिकेटेड बॅरियर्स लावण्यात येतील. तसेच समुद्राच्या दिशेने पाहताना दृश्यमानता कायम राहील, अशा पद्धतीने त्यांची उंची कमी-जास्त ठेवण्यात येणार आहे.

बॅरियर्स लावण्याची मागणी

मरीन ड्राईव्ह वाहतूक पोलीस आणि चर्चगेट परिसरातील रहिवासी संघटनांनी देखील बॅरियर्स लावण्याची मागणी पालिकेकडे केली होती. बॅरियर्सच्या माध्यमातून अपघात टाळता येणे शक्य आहे. त्यासाठीच संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात बॅरियर्स लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT