Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mumbai Mega Block: शनिवारी आणि रविवारी कल्याण-अंबरनाथ दरम्यान मेगा ब्लॉक!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या उल्हासनगर स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक शनिवार-रविवारी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते ३.२० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवांमध्ये वेळात बदल करण्यात येणार आहेत.

सीएसएमटी येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला येथे टर्मिनेट करण्यात येईल. सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.

ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. खोपोली येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल, खोपोली येथून १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन सेवा रद्द राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT