mumbai mega block update centrl railway 6 april to 11 april 2024 express local train timtable change check details
mumbai mega block update centrl railway 6 april to 11 april 2024 express local train timtable change check details
मुंबई

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ६ दिवस असणार रात्रकालीन ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : विक्रोळी रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घाटकोपर ते भाडुंप स्थानकादरम्यान शनिवारी (ता. ६) रात्रीपासून गुरुवार (ता. ११) पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरील लोकल; तसेच मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

एक्स्प्रसेचे वेळापत्रक


- २०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस, १११४० गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस, ११४०२ आदिलाबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि १२१५२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस गंतव्यस्थानी वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचतील. सीएसएमटी-ठाणे लोकल रात्री ११.५७ वाजता कुर्ल्यापर्यंत धावेल आणि पहाटे ४ वाजता कुर्ला येथूनच सीएसएमटीकडे रवाना होईल.


- सोमवारी रात्री ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि १११४० गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे - विद्याविहार स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री १२१०२ शालीमार- एलटीटी एक्स्प्रेस, १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस व २०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस ठाणे -विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
- गुरुवारी रात्री ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२१३२ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि १११४० गदग- सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे ते विद्याविहार दरम्यान सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

लोकलचे वेळापत्रक

- रविवारी रात्री सीएसएमटी- ठाणे लोकल रात्री ११.५७ वाजता कुर्ल्यापर्यंत धावेल आणि पहाटे ४ वाजता कुर्ला येथूनच सीएसएमटीकडे रवाना होईल. ठाणे-सीएसएमटी लोकल पहाटे ५.१६ वाजता धावेल. याशिवाय पहाटे ४.१६ आणि ४.४० ची ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द केलेली आहे.
- बुधवारी रात्री सीएसएमटी- ठाणे लोकल रात्री ११.५७ वाजता कुर्ल्यापर्यंत धावेल आणि पहाटे ४ वाजता कुर्ला येथूनच सीएसएमटीकडे रवाना होईल. बुधवारी ठाणे-सीएसएमटी लोकल पहाटे ५.१६ वाजता धावेल. याशिवाय पहाटे ४.१६ आणि ४.४० ची ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द केलेली आहे.

मुंबईत येणाऱ्या एक्स्प्रेसच्या बदलले मार्ग

ट्रेन क्रमांक एक्स्प्रेसचे नाव शेवटचा थांबा
११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी ठाणे
१८०३० शालिमार-एलटीटी ठाणे
१२८१० हावडा-सीएसएमटी दादर
१८५१४ विशाखापट्टणम-एलटीटी ठाणे
१२१३४ मंगळुरू-सीएसएमटी निळजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT