mumbai metro 3 
मुंबई

मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवर कृत्रिम पडद्याचा वापर; पावसाळ्यातही भुयारीकरणाचं काम राहणार सुरू..   

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  मान्सून कालावधीत मुंबई मेट्रो 3 च्या मार्गिकेवरील  कफ परेड जंक्शन येथे कृत्रिम प्लास्टिक (पीव्हीएस) लावण्यात येत आहे. पावसाळ्यामधे भुयारीकरणाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून बोगद्याच्या बाजूनी कृत्रिम प्रकारचा पडद्याचा वापर करण्यात आला आहे असे मेट्रो-3 च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.   

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3 मार्गासाठी मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नदीपात्रापासून 14 मीटर खोल भागात 90 मीटर लांबीच्या अवाढव्य ‘टनेल बोअरिंग मशिन’द्वारे (टिबीएम) हे काम पूर्ण करण्यात आले आहे.  कफ परेड आणि बीकेसी ही स्थानके जंक्शन असून येथून गाडय़ा पुन्हा वळवण्यासाठी अधिक फलाट बांधण्यात येणार आहेत.  

या स्थानकात गाडय़ांचा मार्ग बदलण्यासाठी अप आणि डाऊन मार्गाव्यतिरिक्त तिसरी मार्गिकादेखील बांधण्यात येत असून, येथे चार फलाटांची योजना करण्यात आली आहे.  वांद्रे कुर्ला संकुल स्थानकात मेट्रो गाडीचा मार्ग बदलण्यासाठी 1.53 किमीची दोन भुयारे पैकी एक भुयार मिठी नदीच्या खाली आहे.

मिठी नदीपात्राच्या पृष्ठभागापासून ते मेट्रोच्या भुयाराच्या तळापर्यंतचे अंतर सुमारे 20 ते 24 मीटर आहे. मिठी नदीच्या तळापासून ते मेट्रो भुयाराच्या वरच्या टप्प्यापर्यंतचे अंतर 9 मीटर. भुयाराचा व्यास 6.2 मीटर आहे. मान्सूनच्या कालावधीत यंत्रणा, मशिन्स आणि कामामध्ये अडचण  निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षतेसाठी कफ परेड जंक्शन येथील बोगद्याला कृत्रिम प्रकारचा पडद्या लावण्यात आला आहे असे एमएमआरसीएलकडून सांगण्यात आले. 

नॅटमचा वापर का?

कफ परेड आणि बीकेसी ही स्थानके जंक्शन असतील. येथून गाडय़ा पुन्हा वळवण्यासाठी अधिक फलाट बांधण्यात येणार आहेत. टीबीएमच्या आधारे भुयारीकरण करताना दुसऱ्या बाजूने यंत्र बाहेर काढण्यात येते. मात्र गाडय़ा वळवण्यासाठी खोदण्यात येणारे भुयार हे एकमुखी असते. अशा भुयारातून टीबीएम काढणे शक्य नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी  न्यू ऑस्ट्रियन टेक्नोलॉजी मेथड (नॅटम)  पद्धतीने भुयार खणण्यासाठी वापर करण्यात येत आहे.

mumbai metro 3 uses plastic shield for building subway and protection from rain  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांना अतिरिक्त होण्याची धास्ती! सप्टेंबरअखेरच्या आधारव्हॅलिड पटसंख्येवर होणार संचमान्यता; शिक्षकांना वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी देण्याचाही निर्णय

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2025

अग्रलेख : शक्तिपरीक्षेचे रंग

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 सप्टेंबर 2025

माण तालुका हादरला! 'राणंदमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून'; शेतातच आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT