Mumbai Metro  sakal
मुंबई

Mumbai Metro: मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना दिवाळी भेट; मेट्रोने आता आणखी उशिरापर्यंत करता येणार प्रवास!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Metro: लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून (अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानक) शेवटची मेट्रो आता रात्री १०.३० ऐवजी ११ वाजता सुटणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. या निर्णयानुसार शनिवार (ता. ११) पासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, की दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. त्यानुसार तसा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी मेट्रोची वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईकरांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याबाबत सूचना केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आतापर्यंत सुमारे सहा कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा यासाठी विविध उपाययोजना राबवत आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णयही मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

२५३ एवजी २५७ फेऱ्या

मुंबई मेट्रो ‘मार्ग २ अ’च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ‘मार्ग ७’च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०.३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिमदरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५.५५ ते रात्री १०,३० दरम्यान सुमारे २५३ सेवा साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.

आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे सकाळी ५.५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होतील. रात्री दहानंतर दहिसर पश्चिम ते गुंदवली आणि डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिमदरम्यान प्रत्येकी दोन अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT