Mumbai Metro News Sakal
मुंबई

Mumbai Metro Update : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोत तांत्रिक बिघाड

रोहित कणसे

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील ३० मिनीटांपासून ही मेट्रोसेवा बंद आहे. मुंबई मेट्रोने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच सेवा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांची कामावरून सुटण्याची वेळ झाल्याने याचा थेट फटका बसणार आहे.

ऑफिस सुटण्याची वेळ असल्याने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. मेट्रोकडून नेमकं काय बिघाड आहे याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाहीये. तसेच पुढच्या किती वेळात मेट्रो सेवा सुरू होईल याबद्दल देखील माहिती देण्यात येत नाहीये. अर्धा किंवा एक तासात मेट्रो सेवा सुरळीत होईल असे वरवरचे उत्तर दिले जात असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान या बिघाडामुळे नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT