Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : उपनगराच्या मीरा-भाईंदर-वसई पोलीस आयुक्तालयाची करडी नजर

१३ पोलिस ठाण्यांमध्ये दहशतवादविरोधी पथक तैनात ; संशयास्पद हालचालींवर करडी नजर

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई (Vasai) तालुक्यासह मीरा-भाईंदर (Mira Bhayander) शहराला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यात या भागाचे नागरिकीकरणही झपाट्याने वाढले आहे. सावर्जनिक ठिकाणी अतिरेकी कारवायांचा बिमोड, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना प्रतिबंध घालता यावा या दृष्टीने मिरा-भाईंदर (Mira Bhayander) पोलिस (Police) आयुक्तालयाने नव्याने १३ पोलिस ठाण्यांमध्ये दहशतवादी विरोधी पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाकडून शहर व ग्रामीण भागात करडी नजर राहणार असून संशयास्पद हालचाली टिपल्या जाणार आहेत.

मुंबई उपनगरातून दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना नुकताच पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीपासून अन्य राज्यात दहशतवाद्यांकडून कट रचला जात होता. मात्र त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. परंतु वसई-विरार, मिरा-भाईंदर शहरात दहशतवादाचे जाळे पसरू नये, सावर्जनिक ठिकाणी अशा बाबींना त्वरित आळा घालता यावा याकरिता पोलिस काम करत असले तरी मात्र स्थानिक पोलिसांकडून देखील सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. याकरिता पोलिस आयुक्तालयाने सतर्क होऊन मिशन आखले आहे.

वसई, नालासोपारा, विरार, उत्तन भागात मोठा सागरी किनारा आहे. या ठिकाणी पर्यटकांचा राबता मोठ्या प्रमाणात असतो. शिवाय या भागाचे नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरिक कुठून आले, कोण आहेत यासोबत शहरातील बारीक सारीक बाबींची नोंद ठेवण्याचे काम पोलिस करणार आहेत. गोपनीय माहिती जमा करण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे नेमण्यात आले आहे. १३ पोलिस ठाण्यात नेमण्यात आलेल्या या पथकात एकूण ७८ पोलिसांचा समावेश आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार शहरात कोरोना निर्बंध हटविण्यात आल्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यावेळी कोणतीही समाजविघातक कृत्ये होऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

काय करणार पथक
-समाजमाध्यमांवर लक्ष
-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याची नोंद
-परदेशातून येणाऱ्या व्यक्तींवर नजर
-संशयास्पद हालचाली दिसल्यास चौकशी
-सागरी किनाऱ्यांवर गस्त
-शहरातील गर्दीच्या ठिकाणची चाचपणी

आयुक्तालयाच्या हद्दीत १३ पोलिस ठाणे आहेत. या ठिकाणी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. समाजविघातक बाबींवर लक्ष देऊन दहशतवादी कृत्य तसेच स्थानिक पातळीवरून मदत केली जाते का, याबाबत पथकाकडून चाचपणी केली जाणार आहे.
विजयकांत सागर, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

पोलिसांकडून जनजागृतीवर भर
वसई-विरारसह मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या वाढत असताना गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी पोलिसांकडून नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. याबाबत अनेक ठिकाणी बैठका घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयित व्यक्ती आढळल्यास तिची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन केले जाते. गुन्हेगारीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचा प्रयोग देखील पोलिसांनी सुरू केला आहे.

कोम्बिंग ऑपरेशन्स
वसई-विरार शहरासह मीरा-भाईंदरमध्ये सोनसाखळी चोरीसह अन्य गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सीसी टीव्हीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याचबरोबर अमलीपदार्थ तस्करी करणाऱ्यांना देखील पोलिसांनी जेरीस आणले आहे. दाटीवाटीच्या वस्तीत गुन्हेगार आश्रय घेत असल्याने अशा ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडून राबवले जाते. पोलिसी कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT