मुंबई

बापरे ! मुंबईत 250 वैद्यकिय कर्मचार्यांना कोरोनाची बाधा; किमान हजार कर्मचारी क्वारंटाईन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक आणि खासगी 20 रुग्णालयातील 250 वैद्यकिय कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर किमान हजार कर्मचार्याना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. पालिकेच्या चर्चगेट येथील नाक कान घसा रुग्णायतील तीन कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 30 जणांची कोरोना चाचणी करुन त्यांना क्वारंटाईन केले आहे. तर शिवडी येथील क्षय रोग रुग्णालयातील डॉक्टर  आणि वॉर्ड बॉयला कोरोनाची बाधा झाली आहे. तर 80 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यात 10 डॉक्टर आहेत.

महानगर पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर, परळ येथील केईएम आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाती 41 वैद्यकिय कर्मचार्यांना आता पर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. व्होकार्ट, जसलोक,भाटिया या महत्वाच्या खासगी रुग्णालयातील कर्मचार्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनावर उपचार करताना वैद्यकिय कर्मचारी योग्य खबरदारी घेतात. तरीही त्यांना कोरोना  होण्याचा धोका असतोच. मात्र, मुंबईत कोरोनाचे उपचार करताना लागण होण्याचे प्रमाण क्वचितच आहे. यात रुग्ण दुसऱ्या आजारासाठी रुग्णालयात आला पण त्याला कोरोनाची बाधा असल्याने कर्मचार्यानाही संसर्ग झाला हे प्रमाण जास्त आहे. वैद्यकिय दृष्ट्या अशा प्रकारे डॉक्टरांना कोरोनाची बाधा होणे ही गंभिर बाब आहे.असे पालिकेच्या एका निवृत्त वैद्यकिय अधिकार्याने सांगितले. 

in mumbai more than 250 doctors are corona infected over thousands are in quarantine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT