rohit pawar sakal
मुंबई

Mumbai : खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह गटाच्या सर्व खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल-रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कल्याण लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर दोन दिवस आले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून या क्षेत्रात भाजप आणि शिंदे गट यांच्यात वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यातच कल्याण लोकसभा क्षेत्रावर सध्या भाजप दावा करत आहे. याविषयी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य करत खासदार डॉ. शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल असा अंदाज वर्तवत त्यांनी शिंदे गटाला सूचक असा इशारा देखील देऊ केला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कल्याण लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर दोन दिवस आले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी राष्ट्रवादी चे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. वंडार पाटील यांच्या घरी गणपतीचे दर्शन घ्यायला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना कल्याण लोकसभा क्षेत्रावर भाजपच्या वतीने दावा केला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिंदे व भाजप गटाचे सूत जुळत नसल्याचे दिसुन येत आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील शिंदे गटावरील नाराजी उघड केली आहे. भाजप आणि शिंदे गटातील बेबनाव विषयी विचारले असता त्यांनी, भाजप कल्याण लोकसभेची सीट मागून घेईल, नाहीतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल असे वक्तव्य केले.

रोहित म्हणाले, भाजपची प्रवृत्ती हीच आहे, लोकनेत्याला जवळ करायचं आणि संपवायचं. भाजपचे स्वतःचे जे लोकनेते होते मुंडे साहेबांपासून फुणकर साहेबांपर्यंत, खडसे साहेबांपासून अनेक असे नेते आहेत ज्यांना स्वतःच्याच नेत्यांनी संपवलं राजकीय दृष्टिकोनातून. तसंच दुसऱ्या पक्षातून त्यांच्याकडे येतात त्यांनाही ते संपवतात.

इथे श्रीकांत शिंदे स्वतः खासदार आहेत. तिथेच भाजपा बैठका घेत. तेव्हा भाजपच्या मनात काय आहे, याचा काही प्रमाणात अंदाज आहे. एकतर भाजप ही सीट मागू शकतो. नाहीतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT