टोपीवाला पुनर्विकास प्रकल्प लवकरच सुरु होणार esakal
मुंबई

Topiwala Redevelopment Project : टोपीवाला पुनर्विकास प्रकल्पाला लवकरच शुभारंभ

Mumbai Topiwala Market : पहिल्या टप्प्यात सुमारे दीड कोटींचा खर्च ; तर पार्किंगसाठी तब्बल १५ कोटींच्या खर्च

सकाळ वृत्तसेवा

Goregaon Topiwala Market : नव्या निविदांच्या प्रतिक्षेत असलेल्या टोपीवाला पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता शुभारंभ होणार आहे. महापालिकेकडून गोरेगावमधील टोपीवाला मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी पालिका पहिल्या टप्प्यात सुमारे दीड कोटींचा खर्च करणार आहे.

बोरिवली पश्चिम येथील ‘पी दक्षिण’ विभागातील पहाडी गाव परिसरात पालिकेने टोपीवाला मार्केट विकसित केले होते. मुंबईतील मोठ्या मार्केटपैकी असलेल्या या मार्केटची उभारणी पालिकेकडून करण्यात आला होती.

तत्कालीन काळात नियोजनबद्ध मार्केट अशी या मार्केटची ख्याती आहे. साधारणतः २५-३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे मार्केट आता जुने झाले असून या मार्केटच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत.येथील पडझड झालेल्या छतामुळे व्यापारीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.

त्यातच रेल्वे स्थानकाजवळच लागून असलेल्या या मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची समस्याही जाणवू लागली आहे. त्यामुळे या मार्केटच्या पुनर्विकासाची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती.

पार्किंगसाठी १५ कोटी

टोपीवाला मार्केटच्या इमारतीची रचना ही तळमजला अधिक ३ मजले आहे. येथील पार्किंगची व्यवस्थाही अपुरी पडत आहे. त्यामुळे पुनर्विकास करताना पार्किंगची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. पालिकेने यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT