Mumbai Municipal Election BJP Shiv Sena Alliance
esakal
BJP-Shiv Sena alliance announces seat-sharing formula : मुंबई महापालिकेसाठी अखेर महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षाने आपली युती जाहीर केली आहे. भाजप १३७ जागा लढवणार आहे तर शिवसेना ९० जागा लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, तत्पुर्वी युतीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमधील घटक पक्षांचाही या जागावाटपामध्ये समावेश असणार आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मीडियाला रात्री उशीरा याबाबत माहिती दिली. भाजप, शिवसेना आणि रिपाईची महायुती ही मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढणार असून, यामध्ये भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढवणार आहे. येणाऱ्या काळात एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल.
कारण, मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडणवण्यासाठी, मुंबईकरांचा महापौर हा मुंबई महापालिकेत विराजमान झाला पाहीजे. जेणेकरून मुंबईचा विकास होत असताना, मुंबईची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहीजे. मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहीजे.
काही मामू लोकांची टोळी ही मुंबईचा ताबा घेवू इच्छित आहे, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरवायचे आहेत. यामुळे आम्ही आज रात्रीच सर्व उमेदवारांना उद्या फॉर्म भरण्याच्या सूचना देत आहोत. महायुतीचे सर्व उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.