bmc election  sakal
मुंबई

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची BMC, राज्य सरकारला नोटीस

रोहित कणसे

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हलचाली वाढल्या असतानाच या निवडणूकांच्या सर्वोच्च न्यायालयातील वॉर्ड संख्येचं प्रकरण ऑगस्ट महिन्यात गेलं आहे. त्यामुळे या निवडणुका पुन्हा पुढे गेल्या आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र पुढील निवडणूका कुठल्या वॉर्ड संख्येनुसार होणार यावरून हा वाद सुरू आहे. मुंबईतील वॉर्डची संध्या मविआ सरकारनने 236 वार्ड केली होती. लोकसंख्येच्या आधारावर असं करण्यात आलं असल्याचे सरकारनं सांगितलं. त्यानंतर ही वॉर्ड संख्या शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा 227 केली आहे. पण हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय मान्य केला. याच निर्णयाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

नियमानुसार आधीच्या जनगननेनुसार वार्ड रचना ठरवावी लागते. त्यामुळे २००१ च्या जनगननेनुसार २२७ ही संख्या होती आणि त्यानंतर २०११ च्या जनगननेनुसार ती आपण २३६ केल्याचं मविआचा दावा होता. याविरोधात तुषार मेहता यांनी प्रतिवाद केला. दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने बीएमसी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यानंतर प्रकरण थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गेलं आहे.

मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं प्रकरण थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गेलं आहे. त्यामुळे याचा निर्मय होईपर्यंत BMC निवडणुका होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. आज कोर्टाने वार्ड संख्येतील बदलाबाबत बीएमसी, राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT