Bribe Case News esakal
मुंबई

Mumbai Crime : लाच स्वीकारताना महापालिकेच्या अभियंत्याला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडुन अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडुन अटक केली आहे. मच्छिंद्र तांदळे असे 50 वर्षीय आरोपी अभियंत्यांचे नाव असून त्याला 2 लाख रुपये लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगे हाथ पकडले.

या प्रकरणात तक्रारदार हे हॉटेल चालक आहे. त्यांच्या हॉटेलचा पोटमाळा बेकायदेशीर असल्याची नोटीस प्रशासनमार्फत पाठवण्यात आली होती. तसेच पोटमाळ्यावर कारवाई करण्याचे नोटिसमध्ये सांगण्यात आले. 23 जून रोजी तोडक कारवाई न करण्याच्या बदल्यात आरोपी अभियंत्यांने हॉटेल मालक शिवानंद शेट्टी यांच्याकडे 3.50 लाख रुपये लाचेची मागणी केली.

शिवानंद शेट्टी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या बाबत तक्रार दाखल केली. आरोपी अभियांत्याशी तडजोड करून शेट्टी यांनी 2 लाखाचा व्यवहार ठरला. त्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत 26 जूनला सापळा रचला. आरोपी अभियंत्याला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT