अधिष्ठात्या डॉ. निलम अंद्राडे यांनी दिलं लेखी आश्वासन
मुंबई: गेली दीड वर्षे रुग्णसेवा करत असूनही काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिक सुविधा (Primary Needs) पुरवल्या जात नाहीत. याच मुद्द्यावरून आज गोरेगाव (Goregaon) येथील नेस्कोच्या (Nesco) जम्बो कोविड केंद्रातील डॉक्टर्स आणि परिचारिकांनी (Nurses) आंदोलन (Protest) केले. या आंदोलनात 150च्या आसपास परिचारक व डॉक्टर्स सहभागी झाले होते. अखेर अधिष्ठात्या (Dean) डॉ. निलम अंदराडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (Mumbai Nesco Jumbo Covid Center Doctors Nurses Protest Agitation Called off after Written Assurance Letter)
आंदोलन करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीने करण्यात आली आहे. या कोविड केंद्रातील डॉक्टर, परिचारकांना राहण्यापासून ते खाण्या-पिण्याच्या प्राथमिक सुविधा नीट मिळत नाहीत. यासाठी अनेक वेळा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज अखेरीस या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. या कोविड केंद्रात दीड हजारच्या आसपास रुग्णशैय्या आहेत. सतत हे वैद्यकिय कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, त्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा पुरवल्या जात नाहीत.
गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत तक्रार केली जात आहे. मात्र, त्याला व्यवस्थापनाकडून दाद मिळत नव्हती. रविवारी झालेल्या आंदोलनानंतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.