मुंबई

सचिन वाझे यांच्यासंदर्भात महत्त्वाची बातमी, आणखी एक 'मोठी' संस्था करू शकते वाझेंनी चौकशी

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 20 : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा मिळण्यासाठी आता एटीएसने विशेष NIA न्यायालयात आज अर्ज दाखल केला. यामुळे आता एटीएसकडूनही वाझे यांंची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पियो गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 तारखेला ठाण्यातीळ मुंब्रा खाडीत सापडला होता. याबाबत आता NIA आणि एटीएस तपास करीत आहे. 

वाझे सध्या अँटिलीया कार स्फोटके प्रकरणात एनआयए कोठडीत आहेत. त्यामुळे एटीएसने आज विशेष न्यायालयात वाझे यांची कोठडी मिळवण्यासाठी अर्ज केला. वाझे यांच्या विरोधात प्रथम दर्शनी पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे त्यांचा ताबा द्यावा अशी मागणी केली आहे. न्यायालयाने हा अर्ज मंजुरी केला असून 25 तारखेला आता सुनावणी निश्चित केली आहे. एनआयएची कोठडी 25 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे त्यादिवशी एनआयएची बाजू न्यायालय ऐकणार आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले सचिन वाझे 13 तारखेपासून अटकेत आहेत. एनआयएने आतापर्यंत त्यांच्या घराची आणि गाड्यांची कसून तपासणी केली आहे.  ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला शुक्रवारी वाझे यांचे प्रोडक्शन वॉरंट मंजूर केले आहे. 

mumbai news antilia bomb scare sachin vaze might be interrogated by anti terrorist squad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT