मुंबई

अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दिला महत्त्वपूर्ण निर्णय

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 5 : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग सत्र न्यायालयात 16 एप्रिलपर्यंत गैरहजर राहण्याची मुभा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिली.

नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी गोस्वामी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना 10 तारखेला सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आज (शुक्रवार 5. मार्च ) रोजी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याचिकेवर निर्णय होईपर्यत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी, असे गोस्वामी यांच्या वतीने सांगण्यात आले. खंडपीठाने ही मागणी मान्य केली असून गोस्वामी यांना 16 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे.

वास्तुविशारद असलेल्या नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी गोस्वामी यांच्यासह तीनजणांचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सन 2018 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटकही केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

mumbai news anway naik case big relief to arnab goswami no need to come in court till 16th april 2021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT