मुंबई

'काट दूंगा, मेरे चाकू को हात मत लगाना'; शिवडी स्थानकात शिरला शस्त्रधारी, पोलिसावर हल्ला

कुलदीप घायवट

मुंबई, ता. 15 : हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकात माथेफिरू शिरल्याची घटना आज ( सोमवार, ता.15) रोजी घडली. माथेफिरूकडे लांब आकाराचे धारदार शस्त्र होते. तसेच तो नशेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी शिवडी स्थानकातील स्थानक प्रबंधक कार्यालयाची नासधूस करून स्वतःवरच वार केले. या माथेफिरू विरोधात वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 

आज सकाळी गर्दीच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना स्थानकात आणि लोकलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी 8:20 च्या सुमारास शिवडी येथे राहणारा आरोपी बावीस वर्षीय नावेद खान याने स्थानकात प्रवेश केला.

शिवडी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर कर्तव्यावर पोलिस शिपाई निलेश जगदाळे होते. यावेळी माथेफिरूने जगदाळे याला 'ए मामा' अशी ओरडून हाक मारली. यावेळी त्याला काय झाले, असे पोलिसाने विचारले. त्यावेळी माथेफिरूने अरेरावीची भाषा वापरली. पोलिसाला याला शिवीगाळ केली व त्याने कमरेला चाकू असल्याचे दाखवले. पोलिसाने विचारले, कंबरेला काय आहे. त्यावर त्याने चाकू काढून दाखवला.

'काट दूंगा, मेरे चाकू को हात मत लगाना' असे तो म्हणाला. पोलिसाने त्याला शांत करण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने अरेरावीची भाषा केली, शिवीगाळ केली. यावर पोलिस त्याला स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयात बंद केले. यासह वडाळा पोलिस ठाण्याला संपर्क साधला. यावेळी चिडलेल्या माथेफिरूने रेल्वेची संपत्ती असलेल्या टेबलावरची काच फोडली. फोडलेल्या काचेवर आपले डोके आपटले. भिंतीवरील पंखा, दोन मॉनिटर तोडून नुकसान केले. यासह माथेफिरूने हातातील काच पोलिसाच्या अंगावर फेकली. त्यामुळे कर्तव्यावरील पोलिसाची पॅन्ट फाटली.

वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने माथेफिरुस ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती वडाळा रेल्वे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिली. 

mumbai news armed and drunk man attacked on duity cop on shivadi station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT