Crime News Sakal
मुंबई

Mumbai News : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; नराधम पित्याला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्नी कामावर गेली असताना 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 50 वर्षीय पित्याला मालाड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुलीने विरोध केला असता आरोपी पित्याने पीडित मुलीसह तिच्या बहिणीलाही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी तक्रारदार मुलीची आई नोकरी करत असून. त्यांचे पती नोकरी अथवा व्यवसाय करीत नसल्यामुळे घऱीच असतात. नोकरी करत असल्यामुळे मुलीची आई दिवसभर कार्यालयात व्यस्त असते.याचाच फायदा आरोपीने उचलला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये तक्रारदार महिलेच्या 16 व 14 वर्षांच्या मुली घरी एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपीने घराचा दरवाजा बंद करून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केला, तसेच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

त्याला विरोध केला असता आरोपीने दोन्ही मुलींना मारहाण केली. पण पित्याच्या भीतीने हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला नाही. अखेर धाडस करून पीडित मुलीने नुकताच आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सोमवारी रात्री विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी पित्याला राहत्या घरातून सोमवारी मध्यरात्री अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT