मुंबई

"जयंत पाटील यांनी पुरुषी वर्चस्ववादी सुलतानी वृत्ती दाखवली", अतुल भातखकळकर का कडाडले?

कृष्ण जोशी

मुंबई : महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणुक लढवणे हा काय पुरुषार्थ आहे का, असे विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनातील बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी, सुलतानशाही वृत्ती दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी नुकतेच सांगली येथे वरील विधान केले होते. महिलेच्या मतदारसंघात निवडणुक लढवणे हे कमीपणाचे काम आहे, असेच याद्वारे जयंत पाटील यांनी सूचित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा मनोवृत्तीच्या पाटील यांचा तत्काळ राजिनामा घ्यावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.  

महिलेच्या मतदारसंघातून निवडणुक लढवणे हे पुरुषार्थाचे काम नाही, हे काहीतरी कमीपणाचे काम आहे, अशी आपल्या मनातील हीन भावनाच जयंत पाटील यांनी या वक्तव्यातून दाखवून दिली आहे. चंद्रकांतदादांनी पुरुषाच्या मतदारसंघातून निवडणुक लढवली असती तर ते पुरुषार्थाचे काम झाले असते, असंही जयंत पाटील यांच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. स्त्री पुरुष समानतेच्या एकविसाव्या शतकातही जयंत पाटील यांनी आपली बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्ती दाखवून दिली आहे. मध्ययुगीन भारतात दिल्लीत राज्य केलेल्या अनेक सुलतानांनी आपले जनानखाने, भोगवादी वृत्ती, याद्वारे आपली पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता दाखवून दिली होती. जयंत पाटील यांचे वक्तव्य आणि मनोवृत्ती अशीच पुरुषसत्ताक सुलतानी प्रवृत्तीची आहे, अशी जळजळीत टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिक अर्थ पुरुषाने शौर्य दाखवणे असा आहे व तो शब्द वापरून जयंत पाटील यांनी महिला व पुरुष यांची तुलना केली आहे. त्यामुळे येथे हा शब्द वापरणाऱ्या जयंत पाटील यांच्या मनातील पुरुषी वर्चस्ववादी आणि महिलांना दुय्यम मानण्याची वृत्ती दिसून येते. तसेच महिलेने तयार केलेल्या मतदारसंघातून निवडणुक लढवणे हा पुरुषार्थ नाही, असे म्हणणाऱ्या जयंत पाटील यांनी तेथील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना कमी लेखून त्यांच्यासह राज्यातील साऱ्या स्त्रीयांचा अपमान केला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले व सावत्रीबाई फुले यांनी दिलेली समतेची शिकवण जयंत पाटील यांना पक्षाकडून देण्याची खरी गरज आहे. सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामतीतून उद्या पार्थ पवार वा रोहित पवार निवडणुक लढले तरीही जयंत पाटील हेच विधान करणार आहेत का ? राज्यात महिला धोरण आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे विधान मान्य आहे का ? केवळ डोक्यावरील पगड्यांची अदलाबदल करून स्त्री पुरुष समानतेचे विचार डोक्यात शिरत नाहीत हे ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

mumbai news atul bhatkhalkar of bjp on jayant patil of national congress party

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT