मुंबई

मोठी बातमी : मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार्स रात्री १ वाजेपर्यंत राहणार सुरु, परवानगी मिळाली

समीर सुर्वे

मुंबई, ता. ६ : मुंबईतील दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत आणि वाईन शॉप्स १०.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर उपहारगृह आणि बार्सना रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ विकऐन्डलाच महापालिकेने खवय्यांना ही भेट दिली आहे. मात्र, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यवसायांना पुर्वीचेच नियम लागू राहाणार आहे.

कोविड काळात व्यवसायांवर असलेली बंधने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत टप्प्या टप्प्याने शिथील करण्यात येत होती. २९ डिसेंबर रोजी राज्य सरकारने परीपत्रक प्रसिध्द करुन व्यवसाय कोविड पुर्व वेळेनुसार सुरु ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, कोविडच्या नियमावलीनुसार सुरक्षीत अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन ही नियमावली पाळणे बंधनकारक आहे. मुंबई महानगर पालिकेने आजपासून व्यवसायांच्या वेळा पुर्ववत करण्याची परवानगी दिली आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज या बाबात परीपत्रक प्रसिध्द केले आहेत.

हॉटेल्स, उपहारगृह, बार, बँक्वेट हॉल्स, फुड कोर्टना सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, दुकानांना सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. तर वाईन शॉप्स सकाळी १० ते रात्री १०.३० पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. या नियमांची अमंलबजावणी न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच महानगर पालिका कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. 

यापुर्वी काही पब, बारमध्ये नियमबाह्य पध्दतीने गर्दी आणि पहाटेपर्यंत व्यवसाय करत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. नियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेतच बँक्वेट हॉल्स खुले करण्याची परवानगी दिली आहे. त्यातही सामाजिक अंतर पाळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बार, बँक्बेट हॉल्स आणि पबवर पालिकेचे लक्ष राहाणार आहे. त्यासाठी विभाग स्तरावर पथकही तयार करण्यात आले आहेत.

mumbai news bars and restaurants will be open till on am in the night bmc gave permission

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT